Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मोठ्या कामासाठी केलेली छोटी तडजोड म्हणजे पालकमंत्री पद देणे -चंद्रकांत पाटील

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 13, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
Breaking News    अखेर अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद, चंद्रकांतदादा यांना अमरावती पालकमंत्री पदाची जबाबदारी..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – माझ्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. कोणीही नाराज व्हायचे कारण नाही. पालकमंत्री पद देणे, ही एका कामासाठी केलेली छोटीशी तडजोड आहे.बारामती लोकसभा जिंकण्याची आता संधी आहे. यावेळी जिंकलो‌ नाही तर पुन्हा कधीच जिंकणार नाही. त्यामुळे मतभेद, वाद बाजूला ठेवून कामाला लागा, अशा‌सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी धायरी‌ बारामती लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मुक्ताई गार्डन येथे झालेल्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. ते म्हणाले, मी पालकमंत्री नाही, म्हणून कार्यकर्ते पदाधिकारी, नाराजी व्यक्त करत आहेत. पालकमंत्री पद देणे हे मोठ्या कामासाठी केलेली छोटीशी तडजोड आहे. ही तडजोड महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा निवडून आणण्यासाठी व नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आहे. त्यामुळे वरीष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर केला पाहिजे.

माझे पालकमंत्रीपद गेले तरी व्हीआयपी सर्कीट हाऊसमधील माझी दोन्ही कार्यालये सुरूच राहणार आहे, मी पूर्वीसारखाच पुण्यात काम करणार आहे, पूर्वीसारखाच मी आपणा सर्वांना भेटणार आहे, पूर्वीसारखाच निधी मिळणार आहे, त्यामुळे कोणताही विचार न करता काम करा. गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकडे असणारे हर्षवर्धन पाटील व त्यांची कन्या आज इकडे आपल्यासोबत आहेत, बाबा जाधवराव त्यावेळी आरदाच इकडे होता, आता तो ही पूर्ण इकडे आहे. इतर गोष्टीही आपल्या बाजूने आहेत, इतर गोष्टीही जूळून आल्या आहेत.त्यामुळे यावेळी बारामती लोकसभा मतदार संघात आपलाच विजय झाला पाहिजे. आता विजय मिळाला नाही तर पुन्हा कधीच विजय मिळणार नाही. त्यामुळे माझा फोटो लहान झाला, तुझा फोटो मोठा होता, यावरून वाद घालत न बसता, आपापसातील हेवेदावे व मतभेद‌ संपवून कामाला लागा, रात्रीच्या अंधारात विरोधकांना भेटने बंद करा, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी केल्या.

बावनकुळे म्हणाले, अमेटी व बारामती लोकसभा मतदार संघ भाजपसाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे‌ यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामती लोकसभा भाजपला जिंकायचीच आहे. बारामती जिंकल्यानंतर त्याचे सर्व श्रेय तुम्हा‌सर्वांना असेल. त्यासाठी तुम्ही कामाला लागा. जे कोणी मन की बात ऐकण्यासाठी येणार नाहीत त्यांना पदावरून हटवले जाईल.भोरमध्ये मन की बात ऐकण्यासाठी अवघे १५ जण होते. मन की बात ऐकण्यासाठी आलाच पाहिजे आणि त्याचे फोटो अपलोड झाले पाहिजे.

===गणेश मारुती जोशी (प्रतिनिधी )

Tags: #adityathackeray#ajitdadapawar#ajitpawar#ajitpawarfc#ajitpawarspeaks#amolkolhe#attitude#balasahebthackeray#DGPMaharashtra#dj#djnixnikhi#dosti#eaknathshinde#harry#hindjagarnews#in#india#jayantpatil#king#lifequotes#lover#maharashtra#marathi#marathistatusking#mumbaikar#mumbaiz #baramatiz #sharadpawarspeaks#nashikcity#ncp#ncpspeaksofficial#nileshpnikam#official#patil#politics#pune#punecity#punekar#punekarsound#PunePolice#rohitdadapawar#rohitpawar#rohitpawarspeaks#satara#sharadpawar#sharadpawarfc#sharadpawarspeaks#sharadpawarspeaks de#shivsena#sound#status#supriyasule#system#top#trend#trending#vasantmore88#views#viral#yaril #friends
Share7Tweet5Send
Previous Post

आता टोल नाक्यांवर मनसेच्याही सीसीटीव्हींची नजर – राज ठाकरे..

Next Post

अजित पवारांनी अनिल भोसलेंच्या पत्नी अन् मुलाला भेट नाकारली , नेमकं काय घडलं ?

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
अजित पवारांनी अनिल भोसलेंच्या पत्नी अन् मुलाला भेट नाकारली , नेमकं काय घडलं ?

अजित पवारांनी अनिल भोसलेंच्या पत्नी अन् मुलाला भेट नाकारली , नेमकं काय घडलं ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks