Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

152 कोटींची संपत्ती जप्त, ईडीचा माजी आमदाराला दणका..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 14, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
152 कोटींची संपत्ती जप्त, ईडीचा माजी आमदाराला दणका..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ईडीने (Enforcement Directorate) अत्यंत मोठी कारवाई केली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील ऊर्फ विवेक पाटील यांना ईडीने जोरदार दणका दिला आहे. ईडीने बँक घोटाळ्याप्रकरणी पाटील यांची 152 कोटींची संपत्ती तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. पनवेल येथील ही कर्नाळा नागरी सहकारी बँक आहे. या बँकेत 512 कोटींचा कथित घोटाळा झाल्याचं सांगितलं जात आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे पनवेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.विवेकानंद शंकर पाटील हे माजी आमदार आहेत. चारवेळा ते पनवेलमधून निवडून आले होते.

पीएमएलए कायद्यांतर्गत आदेश काढल्यानंतर ईडीने ही संपत्ती तात्पुरती जप्त केली आहे. त्यात विवेक पाटील यांचा बंगला, रहिवाशी संकूल आणि भूखंड आदींचा समावेश आहे. पाटील हे शेतकरी कामगार पक्षाकडून चारवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते पनवेलच्या कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आहेत. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचं मूल्य 152 कोटी रुपये आहे. पाटील, त्यांचे नातेवाईक आणि कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कोऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेडशी ही मालमत्ता संबंधित असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं.

234 कोटींची संपत्ती जप्त केलेली

जून 2021 मध्ये विवेक पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची 234 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. तेव्हा त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पाटील यांच्यासह इतर 75 जणांवर एफआयआर दाखल केला होता. त्यावरच ईडीची ही केस आधारीत आहे. तसेच 2019-2020मध्ये रिझर्व्ह बँकेच्या सांगण्यावर ऑडिटही करण्यात आलं होतं.ऑडिट केल्यानंतर पाटील यांनी 63 बोगस अकाऊंटच्या माध्यमातून कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा कर्ज खात्यांतून पैसा काढल्याचं उघड झालं होतं. 2019मध्ये याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने एफआयआर दाखल केला होता. त्याआधारेच ईडीने चौकशी सुरू केली होती.

सोमय्यांचा आरोप काय?

दरम्यान, यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही या बँकेत एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. विवेक पाटील यांनीच हा घोटाळ्याचा केल्याचा दावाही सोमय्या यांनी केला होता. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. बेनामी खातेदारांच्या नावाने हा घोटाळा राजरोसपणे सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही या घोटाळ्याचं प्रकरण लावून धरलं होतं. या प्रकरणात चौकशी केली जात नाही. चालढकल केली जातेय असं भाजप नेत्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर या प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाची एन्ट्री झाली होती.

==== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#nileshpnikam#pune#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

अजित पवारांनी घेतला ससून हॉस्पिटलमध्ये चाललेल्या अंदा धुंद कारभाराचा आढावा.डॉ. ठाकूर ससूनच्या अधिष्ठात यांनी काढला पळ…

Next Post

सिंधुदुर्ग, कोल्हापूर नंतर सोलापुरात गौतमी पाटीलला नो एंट्री, गौतमीच्या नृत्याने हुल्लडबाजी….

हिंदजागर प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, कोल्हापूर नंतर सोलापुरात गौतमी पाटीलला नो एंट्री, गौतमीच्या नृत्याने हुल्लडबाजी....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks