Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

शिक्षण खात्यातल्या भस्मासुरां विरोधात एसीबीचा ट्रिपल धमाका ! सुपे, कांबळे, लोहारांनी कोट्यावधींच्या मालमत्ता कुठून गोळा केल्या ??

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 7, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
शिक्षण खात्यातल्या भस्मासुरां विरोधात एसीबीचा ट्रिपल धमाका ! सुपे, कांबळे, लोहारांनी कोट्यावधींच्या मालमत्ता कुठून गोळा केल्या ??
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाल्याने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी आणि निवृत्त शिक्षणाधिकारी तुकाराम नामदेव सुपे याच्यासह सोलापूरचा निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि सांगलीचा निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.या तिन्ही अधिकार्‍यांकडे सुमारे 10 कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ‘एसीबी’ने एकाचवेळी तीन शिक्षण अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करून दणका दिला आहे.

सुपे याने 1986 ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीत केलेल्या गैरव्यवहारांचे परीक्षण करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 2021 मध्ये पार पडलेल्या टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे याच्याविरुद्ध पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात सुपे याच्याकडून दोन कोटी 87 लाख 99 हजार 590 रुपये आणि 72 लाख रुपये किमतीचे 145 तोळे सोने, असा एकूण मिळून तीन कोटी 59 लाख 99 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सुपे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणून कार्यरत होता. त्यावेळी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यावेळी त्याने जमविलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने मिळविल्याचे तपासातून निष्पन्न झाले. दरम्यान, 5 कोटी 85 लाख रुपयांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमविल्याच्या आरोपावरून सोलापूरचा निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहार कुटुंबीयांच्या नावावर असलेली मालमत्ता त्यांनी बेकायदा जमविल्याचे तपासात उघडकीस आल्याने लोहार याची पत्नी सुजाता किरण लोहार (वय 44) आणि मुलगा निखिल (25, सर्व रा. प्लॉट नं. सी. 2, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीचा निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे आणि त्याची पत्नी जयश्री (दोघेही रा. बारबोले प्लॉट, शिवाजीनगर, बार्शी)यांच्याविरुद्ध भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे याच्याकडे सुमारे 83 लाख रुपये किमतीची मालमत्ता सापडली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

— गणेश मारुती जोशी (हिंदजागर न्युज, पुणे )

Tags: #actionagainstcorruption#againstcorruption#anticorruption#anticorruptionday#bhfyp#business#children#clintoncorruption#college#community#corruption#corruptionfreenigeria#corruptiongoverment#corruptionkills#corruptions#covid#datacorruption#eaknathshinde#education#endcorruption#endcorruptionnow#endgovernmentcorruption#endthecorruption#english#exposecorruption#fightagainstcorruption#fightbackagainstfamilycourtcorruptionandabuse#fightcorruption#fightingcorruption#fuckcorruption#gopcorruption#govermentcorruption#governmentcorruption#harmonycorruption#hindjagarnews#india#inspiration#instagood#instagram#internationalanticorruptionday#kids#knowledge#learn#learning#love#maharashtra#motivation#nileshpnikam#nocorruption#nomorecorruption#notocorruption#placardcorruption#policecorruption#politicalcorruption#powercorruptionandlies#powercorruptionlies#pune#punecity#PunePolice#saynotocorruption#school#science#stopcorruption#stopthecorruption#student#students#study#success#teacher#teachers#teaching#technology#thefightagainstcorruption#trumpcorruption#unitedagainstcorruption#university
Share7Tweet5Send
Previous Post

ललित पाटील प्रकरणात ससूनच्या डॉक्टरला अटक, फोन रेकॉर्डची चौकशीची मागणी…

Next Post

पुणे महाालिकेने नगररोड येथील BRT हटविण्यास सुरुवात…

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पुणे महाालिकेने नगररोड येथील BRT हटविण्यास सुरुवात…

पुणे महाालिकेने नगररोड येथील BRT हटविण्यास सुरुवात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks