Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पुणे महानगरपालिकेत कोट्यवधी रुपयांची टेंडर मर्जीतील ठेकेदाराला मिळवे या साठी विरोधकांचे एकमेकांची हात मिळवणी..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 28, 2024
in राजकीय, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
6 वर्षानंतर महापालिकेच्या 132 अभियंत्यांच्या  बदल्या…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – पुणे महापालिकेतील कोट्यवधी रुपयांची टेंडर मर्जीतील ठेकेदाराला मिळवे यासाठी राज्यातील प्रमुख कट्टर विरोधक असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना सहकार्य करत आहेत.सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांना महापालिकेतील अधिकाऱ्यां विरोधात आंदोलन करता येत नसल्याने ते विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना माहिती पुरवून आक्रमक होण्यास लावत आहेत. त्यामुळे नागरिकांना दाखविण्यासाठी उघड विरोध अन् आतून छुपी युती असा प्रकार सध्या पुणे शहरात सुरू आहे.

पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विविध कामांच्या टेंडर काढल्या जात आहेत. या टेंडरचे काम आपल्यालाच मिळाले पाहिजे, असा काही ठेकेदार कंपन्यांचा आग्रह आहे. त्यासाठी ते त्यांचे राजकीय नातेसंबंध महापालिकेत वापरत आहेत. पण तांत्रिक गोष्टींची पूर्तता करता न येणे, कागदपत्रे अपूर्ण असणे यामुळे हे ठेकेदार अपात्र ठरत आहेत. त्यानंतरही ही टेंडर आम्हाला नाही तर कोणालाच नाही, अशा भूमिका घेऊन राजकीय पक्षांना आक्रमक भूमिका घेण्यास लावत आहेत. पण राज्यात सत्तेत असल्याने आंदोलन करणे शक्य नसल्याने हे विषय विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिले जात आहेत. इतर वेळी एकमेकाविरोधात टीकेची झोड उठवणारे हे पदाधिकारी टेंडरमधून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मात्र एकत्र येत आहेत.

शहरात खड्डे, अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छता, क्षेत्रीय कार्यालयांमधील सावळा गोंधळ, नागरिकांची कामे न होणे असे अनेक नागरी समस्यांचे विषय असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पण टेंडर ठराविक ठेकेदाराला मिळवून देण्यासाठी हे पदाधिकारी एकत्र येत आहेत.

नगरसेवक नसल्याचा असाही फायदा- महापालिकेची निवडणूक झालेली नसल्याने सध्या प्रशासकराज आहे. सर्व निर्णय अधिकारी घेत आहेत. त्यामुळे मुंबईत मोठ्या नेत्यांशी संबंध असलेले काही पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी याचे रूपांतर सुवर्णसंधीमध्ये केले आहे. आपल्याला हवे ते विषय, हव्या त्या पद्धतीने अधिकाऱ्यांकडून करून घेत आहेत.  विशेष म्हणजे नगरसेवक नसल्याने स्थायी समिती, मुख्यसभेत अशा विषयांवर, चुकीच्या गोष्टींवर चर्चा होण्याचा संबंधच नाही. अधिकाऱ्यांच्या स्तरावरच कोट्यवधी रुपयांचे विषय गुपचुप मंजूर करून घेतले जात आहेत.

वजनदार पदाधिकाऱ्याचे उद्योग

– मुंबईत वजन वापरून राज्य शासनातील अधिकाऱ्यांना पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आणण्यासाठी प्रयत्न करणे

– या बदलीमध्ये लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करणे

– मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी टेंडरच्या अटी-शर्तींमध्ये बदल करणे

– त्यासाठी राज्यातील मोठ्या नेत्याकरवी महापालिकेतील अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, फोनवरून चर्चा घडवून आणणे

– नागरिकांच्या प्रश्‍नासाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात, घरापुढे आंदोलन करणे, पण प्रत्यक्षात टेंडरसाठी त्यातून दबाव आणणे

Repoter – विनोद वाघमारे

Tags: #DGPमहाराष्ट्र#hindjagarnews#ncpspeaksofficial#nileshpnikam#pmc#pmcaresfund#pmcollection#pmcpune#punecity#sharadpawarspeaks#एकनाथशिंदे#तुकाराममुंढे#पुणे#पुणेकर#मराठी#महाराष्ट्र#शरदपवार#शिवसेना
Share7Tweet5Send
Previous Post

रेंजहिल्स करांच्या आरोग्याच्या हितासाठी सौ. रोहिणीताई बोरसे यांनी खडकी कॅन्टोन्मेंट विरोधात पर्यावरण विभागाकडे मागितली दाद

Next Post

Breakings News – पुण्यात पुन्हा 14 वर्षे अल्पवयीन मुलाने वानवडी टँकरने अनेकांना उडवले ..

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
Breakings News – पुण्यात पुन्हा 14 वर्षे अल्पवयीन  मुलाने  वानवडी टँकरने  अनेकांना उडवले ..

Breakings News - पुण्यात पुन्हा 14 वर्षे अल्पवयीन मुलाने वानवडी टँकरने अनेकांना उडवले ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks