Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

चंद्रकांत पाटलांच्या ‘कोथरूड’मध्ये भाजप नेता अमोल बालवडकर यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन काहीही झालं तरी लढणार,जाहीर मेळाव्यातून चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध बालवडकर यांनी दंड थोपटले..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 6, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
चंद्रकांत पाटलांच्या ‘कोथरूड’मध्ये भाजप नेता अमोल बालवडकर यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन काहीही झालं तरी लढणार,जाहीर मेळाव्यातून चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध बालवडकर यांनी दंड थोपटले..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजपमधले वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत, त्यामुळे दिवाळीआधीच पुणे भाजपमध्ये फटाके फुटायला सुरूवात झाली आहे. भाजप शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी आज मोठं शक्तीप्रदर्शन करत सुमारे 30 ते 40 हजार नागरिकांना दिवाळी सरंजामचं वाटप केलं.या कार्यक्रमात बोलताना बालवडकर यांनी आपण निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हापासून नेत्यांनी आपल्याला बहिष्कृत केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

कोथरूड मतदारसंघात आपण लादलेला नाही तर स्थानिक उमेदवार आहोत, असा टोलाही बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. आपल्यासमोर कोण असेल याची परवा न करता, कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी निवडणूक लढणार आणि जिंकणार असं सांगत, थेट बंडाची भाषा केली आहे. बालवडकर यांच्या या वक्तव्याने कोथरूड मतदारसंघातील स्थानिक आणि आयात उमेदवारांचा वादही चव्हाट्यावर आला आहे.

ज्यांच्यासाठी   तन मन धन लावून काम केले. पाच वर्ष ज्यांच्या पुढे मागे राहिलो. त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला. पण या नेत्यांना जेव्हा एखादा कार्यकर्ता आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहे असे कळते. तेव्हा हेच नेते आपल्याला धमकी देतात. तिकीट तुम्हालाच मिळणार आहे. निदान एखादा कार्यकर्ता इच्छुक आहे. तेवढे तरी राहू द्या. असे म्हणण्या इतपत या नेत्यांचे मन मोठे नसेल तर मग जनता जनार्दनाचे आशीर्वाद पाठीशी असताना कशाची भीती मनात ठेवायची असे म्हणत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूडमध्ये दंड थोपटले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर संपन्न झाला.या जाहीर मेळाव्यात बालवडकर म्हणाले, नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या लोकसभा निवडणुकीमध्ये मी पक्षाचे काम करण्यासाठी नागरिकांमध्ये जात होतो. त्यावेळी नागरिकांनी माझ्याकडे एक मागणी केली की, आता आपल्याला पुढे गेले पाहिजे. जसे जसे मी नागरिकांशी संवाद साधत होतो. त्या त्या वेळी नागरिक माझ्याकडे हीच मागणी करत होते. नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. ज्या प्रश्नांची सोडवणूक मी करू शकतो असे नागरिकांना वाटत होते. त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा व्यक्त होणे साहजिक होते. पुढे जाऊन कार्यकर्त्यांकडूनही अशी मागणी होऊ लागली की, आता आपण पुढे गेले पाहिजे. गेली दहा वर्ष मी पक्षाचे काम करत आहे. पक्षाची ध्येयधोरणे, योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी जीवाचे रान केले आहे. हे पक्षाला देखील माहित आहे l.जोपर्यंत मी नेत्यांचे काम करत होतो. त्यांच्या मागेपुढे करत होतो. तोपर्यंत माझ्याबद्दल त्यांना कुठलाही आकस नव्हता. पण ज्यावेळी नागरिकांची मागणी, कार्यकर्त्यांचा रेटा वाढू लागला. अशावेळी नागरिकांना बांधील राहून मी विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली. जसा मी इच्छुक झालो. तसा माझ्याबद्दल नेत्यांना आकस वाढला. माझ्या कार्यक्रमांना पक्षाच्या नेत्यांनी येणे टाळले. कार्यकर्त्यांनाही माझ्या कार्यक्रमांना उपस्थित राहू नये अशा धमक्या देण्यात येऊ लागल्या. याही पुढे जाऊन मला पक्षातून काढून टाकण्याची धमकी दिली. पक्षावर माझा विश्वास आहे. परंतु नेत्यांना जर त्यांचा स्वार्थ कळत असेल तर एखाद्या कार्यकर्त्यांनी स्वार्थी झाले तर त्याच्याबद्दल लगेच कारवाई पक्ष करणार का असा माझा सवाल आहे.

बालवडकर पुढे म्हणाले की आजच्या कार्यक्रमातून मी पक्षाला फक्त एवढेच सांगत आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही.पक्षाने माझा विचार करावा मी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूड मतदार संघातून इच्छुक असून पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली तर मग मला वेगळा विचार या जनतेसाठी घ्यावा लागणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

*जनता जनार्दन पाठीशी; मला भीती कोणाची*

अमोल बालवडकर म्हणाले पाच सहा महिन्यापूर्वी माझ्या मनात देखील नव्हते की मला आमदारकीच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. मात्र जनतेने माझ्या मनात हे बीज पेरले आहे. जनतेचा पाठिंबा मला मिळत आहे. जनता जनार्दन माझ्या पाठीशी असताना मला कोणाच्या धमकीला घाबरायची गरज नाही. मला त्यामुळे काही फरकही पडत नाही. जनता माझी पाठीराखी आहे. त्यामुळे माझे कोणीच वाकडे करू शकत नाही.

मतदार संघातील नागरिक हेच माझे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत असेही बालवडकर यावेळी म्हणाले. बालवडकर यांनी मेळाव्यासाठी जमवलेली गर्दी आणि नागरिकांचा मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद याची चर्चा मात्र कोथरूड परिसरामध्ये चांगलीच रंगली आहे.

Repoter – गणेश मारुती जोशी .

Tags: #bjp#bjp4delhi#bjp4maharastra#bjppune#DGPMaharashtra#maharashtra#politics#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर, बोपदेव घाटात तरूणीसोबत गैरकृत्य

Next Post

पुण्यातील घटनेने पुन्हा एकदा खळबळ,बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks