Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

‘भाजपसह अन्य पक्षांतील संधिसाधूंना ऐन वेळी पक्षात घेऊन उमेदवारी देऊ नये,’काँग्रेस निष्ठावंतांचा विरोध, सनी निम्हण यांचा काँग्रेस प्रवेश अवघड ??

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 7, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
‘भाजपसह अन्य पक्षांतील संधिसाधूंना ऐन वेळी पक्षात घेऊन उमेदवारी देऊ नये,’काँग्रेस निष्ठावंतांचा विरोध, सनी निम्हण यांचा काँग्रेस प्रवेश अवघड ??
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – ‘भाजपसह अन्य पक्षांतील संधिसाधूंना ऐन वेळी पक्षात घेऊन उमेदवारी देऊ नये,’ असा ठराव काँग्रेसच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत एकमताने करण्यात आला. हा ठराव करून आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढविण्यासाठी इच्छुक असलेले सनी निम्हण यांच्या पक्ष प्रवेशालाच निष्ठावंतांनी एक प्रकारे विरोध दर्शवल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हा ठराव पाठविण्यात आला आहे. या ठरावामध्ये निम्हण यांचा थेट नामोल्लेख नसला तरी, रोख निम्हण यांच्याकडे असल्याचे सूचक इशारे देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला कसबा, पुणे कॅन्टोन्मेंटसह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगरची जागा काँग्रेसला अल्प मतांनी गमवावी लागली होती. मात्र, या मतदारसंघातील काँग्रेसची ताकद वाढल्याचे मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. या मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी आमदार दीप्ती चवधरी आणि मनीष आनंद इच्छुक आहेत. मात्र, सध्या भाजपमध्ये असलेले सनी निम्हण यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची हालचाल सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बहिरट, चवधरी आणि मनीष आनंद यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची बैठक काँग्रेस भवनात झाली. त्या वेळी ‘बाहेर’च्यांच्या प्रवेशाला विरोध करण्यात आला. तसा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

नेमका हा ठरावात काय आहे ?

‘काँग्रेस सत्तेमध्ये नसताना निष्ठावंतांनी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात सातत्याने संघर्ष केला. सन २०१४ मध्ये संघर्षाच्या काळात शिवाजीनगर मतदारसंघातील संधिसाधू भाजपकडे गेले. काँग्रेसशी गद्दारी करून ‘शत प्रतिशत भाजप’ असा नारा त्यांनी दिला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ दिल्याचे लक्षात आल्यानंतर संघर्षाच्या काळात काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले संधिसाधू पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच ज्यांनी भाजप उमेदवाराच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारे फलक शहरभर लावले, त्यांना पक्षात का प्रवेश द्यायचा, असा प्रश्न उपस्थित करून, काँग्रेस अडचणीत असताना संघर्षाच्या काळात प्रामाणिक आणि नि:स्वार्थीपणे साथ देणाऱ्या निष्ठावंतांना निवडणुकीत संधी द्यावी. त्याला बहुमताने विजयी केले जाईल,’ असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.

काँग्रेस अडचणीत असताना संघर्षाच्या काळात प्रामाणिक आणि नि:स्वार्थीपणे साथ देणाऱ्या निष्ठावंतांना निवडणुकीत संधी द्यावी. त्याला बहुमताने विजयी केले जाईल, असेही या ठरावात नमूद करण्यात आले आहे.

— गणेश मारुती जोशी.

Tags: #bjp#bjp4india#bjppune#congress#congressparty#Congresspune#DGPMaharashtra#hindjagarnews#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#PunePolice#sharadpawar
Share7Tweet5Send
Previous Post

राजकारणातले शरद पवारच बिग बॉस,शंकरराव पाटलांना पवारांनी दोनवेळा चितपट केलं त्यांच्याच पुतण्याच्या हाती ‘तुतारी’;

Next Post

अमोल बालवडकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर गंभीर आरोप,पुणे भाजपमध्ये उमेदवारीसाठी अमोल बालवडकर यांचा पक्ष नेत्यांना खुला इशारा..

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
चंद्रकांत पाटलांच्या ‘कोथरूड’मध्ये भाजप नेता अमोल बालवडकर यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन काहीही झालं तरी लढणार,जाहीर मेळाव्यातून चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध बालवडकर यांनी दंड थोपटले..

अमोल बालवडकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर गंभीर आरोप,पुणे भाजपमध्ये उमेदवारीसाठी अमोल बालवडकर यांचा पक्ष नेत्यांना खुला इशारा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks