Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुण्यात 5 लाखांची मागणी करणार्‍या सहायक पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल,पुण्याच्या गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस निरीक्षकाच्या सांगणवरुन केली होती मागणी ..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 14, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
पुण्यात 5 लाखांची मागणी करणार्‍या सहायक पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल,पुण्याच्या गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस निरीक्षकाच्या सांगणवरुन केली होती मागणी ..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना सहआरोपी करुन अटक न करण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या सांगण्यावरुन तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती २ लाख रुपये मागणार्‍या सहायक पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करत असताना पोलीस निरीक्षकांना संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डर काढून घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संतोष सूर्यकांत क्षीरसागर असे या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ मध्ये तो कार्यरत आहे. याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांचा मित्र तानाजी शेलार यांचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यात तक्रारदार यांना सहआरोपी करुन अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीहीर बहिरट यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या करीता सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर याने ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.

या तक्रारीची गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या रेंजहिल येथील कार्यालयात २१ मे रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात पंचासमक्ष तडजोडीअंती २ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा कारवाई होऊ शकली नव्हती. मात्र, लाचेची मागणी करण्यात आली असल्याने आता लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या या गुन्ह्यातील सहभागाबाबत अधिक तपास सुरु आहे. पोलीस उपअधीक्षक अनिल कटके याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले की, त्यावेळी कारवाई करीत असताना तक्रारदार याच्याविषयी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना संशय आला होता. त्यांनी तक्रारदाराकडील व्हॉईस रेकॉर्डर काढून घेतला होता. त्यामुळे पुढे कारवाई होऊ शकली नव्हती. या कारवाईत काही शंका असल्याने विधी विभागाचे मत मागविण्यात आले होते. त्यानंतर आता गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या सहभागाविषयी तपास करण्यात येत आहे.

— गणेश मारुती जोशी.

Tags: #acb#acb_pune#DGPMaharashtra#maharashtra#nileshpnikam#police#policebharti#policeofficer#politics#punecity#punekar#PunePolice#trap
Share7Tweet5Send
Previous Post

मित्र-मैत्रिणीला बेदम मारहाण, तरुणीच्या करंगळीवर केले वार,बाणेर टेकडीवर फिरायला गेल्या असता…

Next Post

राज्यपाल नियुक्त 7 आमदारांनी घेतली आमदारकीची शपथ..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks