Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

दुचाकी चालकासह मागे बसणारालाही हेल्मेटसक्ती..पाळावा लागेल नियम..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 24, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
दुचाकी चालकासह मागे बसणारालाही हेल्मेटसक्ती..पाळावा लागेल नियम..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News, Repoter – Pune – अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहतूक शाखेतर्फे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, पुणे विभागात हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, पुणे विभागातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महाविद्यालये तसेच शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे.या निर्णयानुसार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. फक्त दुचाकी चालकालाच नाही तर मागे बसलेल्यांना देखील हेल्मेट बंधनकारक असणार आहे. या बाबत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निर्देश जारी केले आहे. तसेच नियमभंग करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर संबंधित प्राधिकरणाने दंडात्मक कारवाई करत त्यांच्या सेवा पुस्तकात कारवाईची नोंद घ्यावी, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत.

सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकांना अपघातामुळे आपले प्राण गमवावे लागत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच सुरक्षित प्रवासासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पुणे विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, डॉ. पुलकुंडवार यांनी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी चालविणाऱ्या तसेच दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन करणे प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. त्यानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा, 1989 (शिस्त व अपील) मधील नियम 3 (1) च्या पोटनियम 18 व कलम 19 मध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही कायद्याच्या विरुद्ध कृत्य करता येणार नाही असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दंडासह शिस्तभंगाची कारवाई

जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, हेल्मेटचा वापर न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार, संबंधित कार्यालय प्रमुखांनी शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यामार्फत दंड वसूलीची कार्यवाही करावी आणि त्याची नोंद मूळ सेवापुस्तकात घेण्याची कार्यवाही करावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

नुकतीच विधानभवन येथे पुणे शहर तसेच जिल्हा व विभागातील रस्ते अपघात व पर्यायाने होणारे मृत्यू कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षतेखीली रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे होते. या बैठकीत चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला.

Repoter – Pradeep Kambale.

Tags: #accidents#cppune#dcptraffic#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#puneaccident#punecity#punekars#PunePolice#punetraffic#rto#rtorule#trafficpolice
Share7Tweet5Send
Previous Post

तापकीर आणि सुनील टिंगरेंसमोर धोक्याची घंटा ??? पुण्यात महायुतीत 2 मतदारसंघात होणार अदला बदली..!!!

Next Post

Breaking News – पिंपरी चिंचवड मध्ये पाण्याची भलीमोठी टाकी कोसळली,ढिगाऱ्या खाली अनेकजण अडकले, दोघांच्या मृत्यू..

हिंदजागर प्रतिनिधी

Breaking News - पिंपरी चिंचवड मध्ये पाण्याची भलीमोठी टाकी कोसळली,ढिगाऱ्या खाली अनेकजण अडकले, दोघांच्या मृत्यू..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks