Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

विक्रीचे व्यवहार मंदावून बोगस व्यवहारांचे प्रमाण वाढले,अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करावी – श्री. निलेश प्रकाशशेठ निकम.

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 26, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
विक्रीचे व्यवहार मंदावून बोगस व्यवहारांचे प्रमाण वाढले,अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करावी  – श्री. निलेश प्रकाशशेठ  निकम.
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – Pune – तळेगाव दाभाडे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ‘चला दिवाळी आली, स्वस्तात प्लॉट घ्या आणि स्वतःच्या घरात राहा, दोन गुंठ्याला एक तोळा सोने, पाच गुंठ्याला दुचाकी; तर दहा गुंठ्याला एक गुंठा मोफत,’ अशी आमिषे दाखवून अनधिकृतरीत्या शेतजमिनीच्या एक ते १५ गुंठ्यांच्या प्लॉट विक्रीचा धंदा मावळ तालुक्यात जोमाने चालू आहे.त्यामुळे, फसवणूक टाळण्यासाठी लेआऊट समक्ष अधिकाऱ्याने मंजूर केला आहे का ? याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन श्री निलेश प्रकाशशेठ निकम यांनी केले आहे. तसेच अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या दलाल, विकसकांवर तहसीलदार, मावळ यांनी लवकरात लवकर कारवाई याबाबत तक्रारी अर्ज व पाठपुरावा श्री. निकम श्करीत आहे.

मावळ तालुक्यात ५ ते ६ वर्षांपूर्वी जमिनीचे भाव गगनाला भिडले होते. परंतु नोटबंदीनंतर मंदीची लाट आली. त्यानंतर, कोरोनाचे महासंकट आले. त्याने जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार मंदावून बोगस व्यवहारांचे प्रमाण वाढले.

मंदीच्या लाटेवर मात करण्यासाठी काहींनी डोंगराच्या पायथ्याशी तसेच गावोगावी रस्ता करून जमिनी खरेदी केल्या. त्यांचे सपाटीकरण करून रस्ते, वीज, पाण्याची सोय दाखवून अडीच लाखांपासून पाच लाखांपर्यंत त्या विकण्याचा सपाटा लावला आहे. काही गोरगरिबांनी यापूर्वी अनेक ठिकाणी प्लॉट घेतले आहेत. परंतु ते बिगरशेती नाहीत. त्यावर बॅंकेचे कर्जही मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत.

नियम, आमिषे आणि अडचणी…

– शासनाच्या नियमानुसार अकरा गुंठ्यांपर्यंत नोंद होत नाही.

– सामूहिक ७/१२ करून देतो, असे प्लॉट विक्रेत्यांकडून खोटे आश्वासन.

– प्लॉट घेणाऱ्या ग्राहकांचे खरेदी खत होत नाही म्हणून विकसन करारनामा केला जातो

– प्लॉट घेणाऱ्या ग्राहकाला कर्ज मिळत नाही, बांधकामासाठी शासकीय परवानगी मिळत नाही.

– प्लॉटिंग अंतर्गत जागा खरेदी करताना बिगरशेती (एनए) परवानगी आवश्यक.

– तुकडी बंदी कायदा अस्तित्वात असल्याने नोंदणी होत नाही.

– राज्य शासनाच्या १२ जुलै २०२१ च्या परिपत्रकाद्वारे ११ गुंठ्यांपेक्षा कमी प्लॉटच्या नोंदी देखील रद्द होऊ शकतात.

मान्यताप्राप्त आराखडा हवा

प्लॉटिंग करताना संबंधित विकसकाने संपूर्ण आराखडा बनवून त्याला पीएमआरडीकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे, परंतु, अशी परवानगी न घेता अनेक विकसक शेतजमिनीत किंवा विनाविकास क्षेत्रात परस्पर प्लॉटिंग करतात. त्यामुळे, सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे. प्लॉटिंगमध्ये बांधण्यात येत असलेली घरे व इमारती यांना रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन इत्यादी सुविधा प्लॉटिंग विक्रेत्यांनी उपलब्ध करून न दिल्यास संबंधित नागरिकांनी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, पोलिस अधीक्षक व पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार करणे आवश्यक आहे.

निवासी क्षेत्रा (आर झोन) अंतर्गत प्लॉटिंगमध्ये जागा खरेदी केली असेल; तर बाजारभावाच्या २५ टक्के नजराणा भरून नोंदी करता येतात. शेतजमिनींचे अनधिकृत तुकडे पाडून त्याची विक्री केली जाते. त्यांचे खरेदी खत होत नसल्याने नोटरी केले जाते. त्यांचा सातबारा होत नाही. लेआऊट समक्ष अधिकाऱ्याने मंजूर केला आहे का ? रीतसर परवानगी घेतली आहे का ? याची खात्री करून घ्यावी, असे नसल्यास प्लॉट अनधिकृत, बेकायदा ठरतात. त्यामुळे, हस्तांतर बेकायदा ठरून जमीन सरकार नावे होण्याची कारवाई होते. त्यामुळे, अनधिकृत प्लॉटची खरेदी करू नये. अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करावी. – श्री.निलेश प्रकाशशेठ निकम.

—- Repoter – Ganesh Maruti Joshi.

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#illegal#illegalconstruction#nileshpnikam#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

मनसेकडून निष्ठावंत आणि तरुण युवक गणेश भोकरे यांना कसबा विधानसभेच्या मैदानात.

Next Post

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकाच्या बैठका, नागरिकां करिता एकूण दहा ते बारा मार्गांवर सूचना फलक आणि पोलीस मदत केंद्र – महेश बोळकोटगी ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक,बाणेर पोलीस स्टेशन )

हिंदजागर प्रतिनिधी

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकाच्या बैठका, नागरिकां करिता एकूण दहा ते बारा मार्गांवर सूचना फलक आणि पोलीस मदत केंद्र - महेश बोळकोटगी ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक,बाणेर पोलीस स्टेशन )

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks