Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मावळ पॅटर्न सुस्साट !!!!! मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा ,महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं ?????

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 6, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
मावळ पॅटर्न सुस्साट !!!!!  मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा ,महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं ?????
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – PUNE – राज्यातील बहुतांश मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी रोखण्यात आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश आलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अंतिम लढती निश्चित झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्यादिवशी अनेक मतदारसंघात बंडखोरांनी आपली तलवार म्यान केल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये, मावळ पॅटर्नची चर्चा जोरदार सुरू असून माजी नगरसेवक नाना काटे यांनीही माघार घेतली आहे. नाना काटे (Nana Kate) यांची बंडखोरी टाळण्यासाठी आज शरद पवार आणि अजित पवार फोनाफोनी केली होती. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही नाना काटेंसोबत फोनवर संवाद साधला. त्यामुळे नाना काटे कोणता निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर नाना काटे यांनी आपली तलवार म्यान केल्याने चिंचवडमधील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, त्या बदल्यात भाजप महायुतीने मावळमध्ये युती धर्म पाळावा अशी अपेक्षा नाना काटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे. मात्र, मावळमधील भाजप ही सुनील शेळकेंविरुद्ध काम करणार असल्याचं बाळा भेगडेंनी म्हटलंय.
पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात भाजप नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची भूमिका केलीय. त्यामुळे, बाळा भेगडेंनी सुनिल शेळकेंविरुद्ध शड्डू ठोकला असून बापू भेगडे यांच्या पाठिंब्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे, येथील मतदारसंघात मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मनसेनं आपली भूमिका जाहीर केली असून बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याबाबत पत्रक जाहीर केलं आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे पत्र शेअर करण्यात आलं आहे. ”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणूकीत 204 मावळ विधानसभेचे उमेदवार अण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर पाठींबा देत आहेत. मावळ विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती,” अशा आशयाचे पत्रकच मनसेच्यावतीने काढण्यात येणार आहे.
शेळकेंविरुद्ध बाळा भेगडेंची ठोकला शड्डू
पिंपरी चिंचवडमध्ये नाना काटेंनी बंडखोरी मागे घेताना मावळ पॅटर्नमधून भाजपने पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. पण हा दावा भाजप नेते बाळा भेगडेंनी खोडून काढला. अगदी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंचा प्रचार केला तरी स्थानिक भाजपा आमचे बंडखोर उमेदवार बापू भेगडेंचा प्रचार करणार, अशी आक्रमक भूमिका बाळा भेगडेंनी घेतली आहे. त्यामुळे, फडणवीसांच्या मध्यस्थीनंतरही मावळमध्ये सुनील शेळकेंविरुद्ध भाजप काम करणार की शेळकेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार हे पाहावे लागेल.
मावळमध्ये संपूर्ण भाजप ताकदीने पाठीशी ठेवणार – फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना काटेंना फोन करुन संवाद साधला. त्यावेळी, मावळ पॅटर्न आणि सुनील शेळकेंसंदर्भात चर्चा केली. ”मी संपूर्ण भाजप त्यांच्यामागे उभी करतोय, पण जे आपल्याला सोडून गेले आहेत, त्यांची मी तुम्हाला गॅरंटी देत नाही. मी स्वत: जात आहेत, सुनीलला माहितीय मी किती प्रयत्न केले, स्वत: बावनकुळे साहेब 4 तास तिथं बसून होते. मात्र, ते ऐकायला तयारी नाहीत. पण, मी भाजपची ताकद सुनील शेळकेंच्या पाठीशी उभी करतोय,” असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मावळ पॅटर्न हाणून पाडण्यासंदर्भात व महायुतीचा धर्म पाळण्याबाबत नाना काटेंना आश्वस्त केलं.
——– Ganesh Maruti Joshi.
Tags: #bharatkemannkibaat#bjp#bjpsankalppatr#chowkidarphirse#congress#DGPMaharashtra#eaknathshinde#economy#election#elections#generalelections#hindjagarnews#india#indianarmy#instagood#loksabhaelection#loksabhaelections#maharashtra#mainbhichowkidar#modi#modifor#mumbai#narendarmodi#narendramodi#nileshpnikam#parliament#phirekbaarmodisarkar#politics#pune#punecity#punekar#PunePolice#rahulgandhi#railways#rajyasabha#rss#sharadpawarspeaks#spardhapariksha#tukarammundhe#viteright#voteforbjp#votekar
Share7Tweet5Send
Previous Post

एकता समितीचा सिद्धार्थ शिरोळे यांना पाठिंबा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघतील पथविक्रेते यांची ही समिती आहे..

Next Post

बंडखोरांमुळे महायुतीच्या अडचणीत वाढ ???? बंडखोरीमुळे पुण्यात महाविकास आघाडीला धक्का ??? परिणाम उमेदवारांवर, ही तर शोकांतिका, ‘आप’ ची टीका !!!!

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
बंडखोरांमुळे महायुतीच्या अडचणीत वाढ ???? बंडखोरीमुळे पुण्यात महाविकास आघाडीला धक्का ???  परिणाम उमेदवारांवर, ही तर शोकांतिका, ‘आप’ ची टीका  !!!!

बंडखोरांमुळे महायुतीच्या अडचणीत वाढ ???? बंडखोरीमुळे पुण्यात महाविकास आघाडीला धक्का ??? परिणाम उमेदवारांवर, ही तर शोकांतिका, 'आप' ची टीका !!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks