Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

महाविकास आघाडीने आमच्या योजना चोरल्या; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 9, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
महाविकास आघाडीने आमच्या योजना चोरल्या; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – PUNE – महायुतीने राज्यातील जनतेचा विचार करून केलेल्या त्यांच्या हिताच्या योजना महाविकास आघाडीने चोरून त्याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

विरोधक हे दुतोंडी असून समाजात ते जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यापासून आपण सावध राहायला हवे, असे ते यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवाजीनगर मतदार विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन गोखलेनगर परिसरातील शहीद तुकाराम ओंबळे मैदानावर करण्यात आले होते. या सभेला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कोथरूड मतदार संघातील महायुतीचे उमदेवार चंद्रकांत पाटील, कसबा मतदार संघातील महायुतीचे उमदेवार हेमंत रासने, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आरपीआय (आठवले) गटाचे परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे सरकार सत्तेमध्ये असताना त्यांनी विकास बंद पाडला होता. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. पण सत्ता मिळवण्यासाठी अनैसर्गिक आघाडी झाली आणि त्यामधून महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले. जेव्हा हे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेमध्ये होते, तेव्हा राज्याचा विकास पूर्णपणे थांबला होता.’ महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर भाजपच्या अनेक आमदारांनी वनवास दूर केल्याची भावना आपल्याकडे व्यक्त केल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आल्यापासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक कॅबिनेट बैठकीत सरकारने जनहिताचे निर्णय घेतले आहेत. सव्वा दोन वर्षात महायुतीने केलेले काम जनतेच्या हिताचेच राहिले आहे. युती सरकारच्या काळात सुरु झालेली लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे प्रयत्न सावत्र भावांनी केल्याची टीका यावेळी शिंदे यांनी केली. विधानसभेचे मतदान झाल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणारा असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

सिद्धार्थ शिरोळे हे लोकप्रिय, आदर्श आणि कार्यसम्राट आमदार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याने विधानसभेत केलेल्या कामाचे कौतुक केले. शिरोळे यांच्या घराला राजकीय वारसा आहे, त्यांचे वडील पुण्याचे खासदार होते हे सांगताना पुण्यातील सुज्ञ मतदार पुन्हा त्यांना विधानसभेत पाठवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्याकडे विशेष लक्ष आहे, म्हणून त्यांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांची मंत्रीपदी नियुक्ती केली आहे. पुण्यात मेट्रोचा विकास होत आहे, इतकेच नाही तर उद्योग क्षेत्रात देखील ते पुढे चालले आहे. इथला वाहतुकीचा प्रश्न सोडवून पुणे हे ट्रॅफिकमुक्त करायचे असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. आमचे सरकार हे ‘कॉमन मॅन’चे सरकार आहे, त्यामुळे भविष्यात देखील त्याच पद्धतीने जनतेच्या कल्याणासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

सिद्धार्थ शिरोळे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या मतदार संघात केलेल्या कामाचा आढावा घेतला. पुणे विद्यापीठ चौकामध्ये सुरु असणारे उड्डाणपुलाचे काम वेगात सुरु असून येत्या जानेवारी महिन्यात त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महायुतीमधील घटक पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

——– गणेश मारुती जोशी.

Tags: #bjp#bjp4gujarat#congress#DGPMaharashtra#hindjagarnews#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#punekar#PunePolice#shivsena
Share7Tweet5Send
Previous Post

सिद्धार्थ शिरोळे हा राजकारणातील संस्कारी चेहरा – पंकजा मुंडे

Next Post

पुण्यातील धक्कादायक प्रकार – पुण्यात मुलांना ठार करण्याची धमकी देत आईवर सामूहिक अत्याचार..

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पुण्यातील धक्कादायक प्रकार – पुण्यात मुलांना ठार करण्याची धमकी देत आईवर सामूहिक अत्याचार..

पुण्यातील धक्कादायक प्रकार - पुण्यात मुलांना ठार करण्याची धमकी देत आईवर सामूहिक अत्याचार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks