Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

वसंत मोरे हाती घेणार तुतारी ??? थेट ठाकरेंच्या उमेदवारालाच ऑफर दिली!!!!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 11, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
वसंत मोरे हाती घेणार तुतारी ??? थेट ठाकरेंच्या उमेदवारालाच ऑफर दिली!!!!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – PUNE – हडपसर विधानसभा मतदारसंघांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कात्रजमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना पक्षप्रवेशाची खुली ऑफर दिली.

“वसंत मोरे तुमच्या हातात आता मशाल आहे. तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो”, असे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी दिले. त्यामुळे वसंत मोरे आगामी काळात राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, यावेळी समालोचकाने गुलाबी शर्ट घातलेला बघायला मिळाला. त्यावर जयंत पाटील यांनी हसतहसत आक्षेप नोंदवला. यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

“हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रशांत जगताप यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिलीय. ते महाराष्ट्रातील एकमेव शहर अध्यक्ष आहेत जे शरद पवारांसोबत राहिले. प्रशांत जगताप यांनी स्पष्ट सांगितलं, मला तिकडं येणं शक्य नाही. मला परत फोन करू नका. लोकसभेनंतर महाराष्ट्रातील सरकार घाबरलं आणि म्हणेल त्या गोष्टी करायला सुरु केलं. आमचं घड्याळ चोरीला गेलेय, हा आमचा प्रॉब्लेम झालाय. चोरीला गेलेलं घड्याळ आम्हाला दिसत आहे. शरद पवारांनी त्या घड्याळाचे काटे थांबवले आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.

‘ह्यांना कोयता गँग कंट्रोल होत नाही आणि…’

“पुणे शहरातील ट्रॅफिकच्या नावावर सत्ता भोगली, पण प्रश्न सुटले नाहीत. पुणे शहराची नवी ओळख ड्रग्सचे शहर होतेय की काय? अशी भीती आहे. कोयता गँग देखील पुण्यात आहे. ह्यांना कोयता गँग कंट्रोल होत नाही आणि मग राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे काय?”, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.

‘भाजपकडून शिवरायांचा अपमान’

“भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जातोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील वक्तव्य केलं. शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. डबल इंजिन सरकारला दिल्लीत कोणीही विचारत नाही. पावसाळी अधिवेशनात सरकाने एक कायदा आणलाय. फडणवीस कायदा. ह्या कायद्यानुसार तुमचं घर-दार जप्त करू शकतात. महाराष्ट्रात कोणी आंदोलन केलं तर त्याला आतमध्ये टाकायचं”, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील भाषणात आणखी काय-काय म्हणाले?

1) “महागाई वाढलीय. तेलाचा डबा 500 ने वाढला. जीएसटी कर मोठ्या प्रमाणात वाढले. तुम्ही सरकारला वर्षाला लाख रुपये टॅक्स देतात. महाराष्ट्रात पाहिजे तशी उधळपट्टी सुरु केली आहे. 17 उद्योग महाराष्ट्रात येणार होते ते बाहेर गेले. काल-परवा मोदींनी टाटा एअरबसचं उद्घाटन केलं. महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम केलं. एकनाथ शिंदे म्हणत होते मोदींनी सांगितलंय मोठा प्रकल्प देऊ. म्हणजे भोपळा देऊ”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

2) “मी अर्थमंत्री असताना महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होता. गुजरात आता पुढे गेला. गुजरात पेक्षा महाराष्ट्र गरीब झाला. महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे. याचा जाब विचारला पाहिजे. दोन वेळा सुरत महाराजांनी लुटली. फडणवीस ते कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. गडबडीत शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. मुंबईच्या समुद्रात भूमिपूजन केलं. पाण्यावर भूमिपूजन आयुष्यात पहिल्यांदा पहिलं, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. एक नारळ पडला नाही पण पुतळा कोसळतोय”, असं जयंत पाटील म्हणाले.

3) “आमचं सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना सुरु करणार आहोत. महिलांना दर महिन्याला 3000 रुपये देणार, एसटी प्रवास महिलांना मोफत करणार. सुशिक्षित बेरोजगारांना 4000 रुपये देणार. प्रत्येक कुटुंबाचा 25 लाख रुपयांचा विमा देणार. आम्हाला काही लोक म्हणतात यांच्या बापाला जमणार नाही. मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री राहिलोय”, असं जयंत पाटील म्हणाले.

4) “समोरचे पैसे खर्च करतील. पैशाने काहीही करू शकतो असं समोरच्यांना माहिती आहे. आमचा पक्ष का फुटला? हे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. शरद पावरांना सोडण्याचं काहीही कारण नाही. सगळ्यांच्या मागे भुंगे होते म्हणून गेले”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

——– गणेश मारुती जोशी.

Tags: #bjp#congress#hindjagarnews#maharashtra#pune#punecity#punekar#PunePolice#sharadpawar#sharadpawarspeaks#spardhapariksha#vasantmore#vasantmore88
Share7Tweet5Send
Previous Post

खडकी परिसरातील नागरिकांचा सिद्धार्थ शिरोळे यांनाच निवडून आणणार निर्धार..

Next Post

सिद्धार्थ शिरोळे कोकणवासीय नागरीकांचा खंदा पाठीराखा ..समस्त कोकणवासीय मेळाव्यात सिद्धार्थ शिरोळेंना जाहीर पाठिंबा..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks