Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

मुख्यमंंत्री फडणवीसांनी विधानसभेत ”वाल्मिक कराडचं नाव घेऊन सांगतोय ” थेटच सांगितलं

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 21, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
मुख्यमंंत्री फडणवीसांनी विधानसभेत  ”वाल्मिक कराडचं नाव घेऊन सांगतोय ” थेटच सांगितलं
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HINDJAGAR- NEWS – NAGPUR – बीडमधील मस्सजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस एसपींची तात्काळ बदली करणार असल्याची घोषणा सभागृहात केली. मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना थेट वाल्मिक कराडचे नाव घेत कारवाईचा शब्द दिला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. वाल्मिक कराड हा प्रकरणाचा मास्टरमाईंड असून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत त्याचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

वाल्मिक कराडबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाळेमुळे खणून काढणार असून मास्टरमाईंड कोणीही असून त्याला शिक्षा होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, वारंवार वाल्मिक कराडचे नाव घेतलं गेलंय, त्यामुळे सांगतो की , या गुन्ह्यात कुणीही दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. त्याचे फोटो सर्वांसोबत आहेत. आमच्या सोबत, पवार साहेबांसोबतही फोटो आहेत. तो कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, त्याचा विचार न करता कारवाई करण्यात येणार आहे. एका प्रकरणात तो आरोपी आहे, त्यात कारवाई होणाच, पण या प्रकरणात पुरावे मिळाल्यानंतर त्याला सोडणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदनात काय म्हटले..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत परभणी हिंसाचार आणि बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन सादर केले. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मस्साजोगचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपुरतं प्रकरण नाही. याची पाळेमुळे खणावी लागतील. एव्हाडा एनर्जी यांनी बीडमध्ये पवनचक्की मध्ये गुंतवणूक केली आहे. यातून काही लोकांना रोजगार मिळत आहे. आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या असा प्रकार सुरू आहे.

अशोक घुले, नारायण घुले. प्रतिक घुले असे आरोपी दुपारी तिकडे गेले. तेथील वॉचमनला मारहाण केली. पीडितांनी सरपंचांना फोन केला.आरोपी बाजूच्या गावचे होते. देशमुख आणि अन्य काहीजण तिथे पोहचले. त्यांना चोप दिला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले. त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले आणि स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली.

सरपंचांचा भाऊ हा सातत्याने विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. 15 ते 20 मिनिटांत सोडतो असे सांगत होता,पण सोडले नाही. प्रचंड मारहाण केली त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सुरेश धस यांनी मुद्दा मांडला, त्यांचे डोळे जाळले नाही, डोळ्यावर मारहाण केलेली आहे, पण ही निर्घृण हत्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हटले.

News Repoted By – P. S. SURYANSHI..

Tags: @ #devendrafadanvis#bjp#congress#crime#dgp#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#maharashtra#mumbai#nagpur#nileshpnikam#police#politics#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

मुंबईच्या समुद्रात बोट बुडाली, एकाच मृत्यू..

Next Post

HMPV Virus update: अलर्ट! HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री, नागपुरात आढळले 2 रुग्ण..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks