Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

राष्ट्रवादीकडून बेरजेचे राजकारण; खासदार सुप्रिया सुळे यांच्या वेगवान हालचाली

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 9, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
राष्ट्रवादीकडून बेरजेचे राजकारण; खासदार सुप्रिया सुळे यांच्या वेगवान हालचाली
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दोन गट पडले, अशी राजकीय परिस्थिती असली तरीदेखील इंदापूर तालुक्‍यात मात्र बारामतीच्या पवार घराण्याला, तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आज तरी शरद पवार गट, अजित पवार गट असे राजकीय अंतर स्पष्टपणे देण्यास तयार नाहीत; मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर शहरावर आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असावे यासाठी विशेष लक्ष दिले असून, इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या इंदापूर शहरातील निवासस्थानी जाऊन, संपूर्ण शहा परिवाराची अचानक सदिच्छा भेट भेटली.त्यामुळे इंदापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस मय करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वेगवान हालचाली सुरू झाल्याची चर्चा इंदापुरात रंगलेली आहे. काही महिन्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजित पवार गट राज्यातील सत्तेच्या बाजूने झाला. त्यामुळे एकसंध असणारी राष्ट्रवादी विभागली गेली. इंदापूर तालुक्‍याचे राजकीय वातावरण मात्र या राजकीय खेळात सध्याच्या घडीला तापत चालले आहे. आमदार दत्तात्रय भरणे आजपर्यंत खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्‍याच्या हद्दीत येताच, आपल्या हाताची कामे सोडून इंदापूर तालुक्‍यात आमदार भरणे तळ ठोकायचे; मात्र आताचे राजकीय चित्र वेगळे दिसते आहे. तरीपण कोणत्याही विकास कामासाठी तालुक्‍याला निधी मिळाला की, खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख आमदार दत्तात्रय भरणे करतात.इंदापूर नगर परिषदेच्या हद्दीतील अनेक प्रश्‍न संदर्भात माहिती घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी देशपातळीवर आदर्श ठरलेल्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांची घरी जाऊन भेट घेतली. खरे तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यात कोठेही शहा परिवाराच्या भेटीचा उल्लेख नव्हता. मात्र राजकारणाच्या कोंदणातील हिरा म्हणून काम करत असलेल्या, शहा परिवाराला आगामी काळात राजकीय पाठबळ देण्याची भूमिका खासदार सुळे यांनी घेतल्याचे खात्रीलायक कळते. त्यामुळे काही महिन्यातच इंदापूर नगर परिषदेची व इतर तालुक्‍यातील महत्त्वाच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये शहा परिवार पूर्ण ताकदीने उतरला तर मात्र वेगळे चित्र इंदापूर शहरवासी यांना पाहण्यास मिळणार आहे हे मात्र निश्‍चित.

दुरावलेली मंडळी पुन्हा संपर्कात

राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून दुरावलेली अनेक मंडळी व इंदापूर तालुक्‍यातील राजकीय मातब्बर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठिंबा देताच, आपल्याबरोबर घेण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी यश मिळवले आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, शिवसेनेचे इंदापूर तालुकाप्रमुख महारुद्र पाटील, राष्ट्रवादीचे युवक नेते अमोल भिसे, अरबाज शेख अशा अनेक नेत्यांची फळी खासदार सुळे उभी करीत आहेत.

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

Breaking News ताथवडेत जेएसपीएम कॉलेजजवळ चार स्फोट; परिसरात घबराट..

Next Post

४१ हजार जणांना नोटिसा, ४ दिवसांत ६८ प्रॉपर्टी जप्त; मालमत्ता कर थकवल्याने कारवाई..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks