Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

डॉ.आंबेडकर जयंती दिमाखात साजरी करण्यावर कार्यकर्ते ठाम..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 25, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
डॉ.आंबेडकर जयंती दिमाखात साजरी  करण्यावर कार्यकर्ते ठाम..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिमाखात साजरी करण्यावर आम्ही ठाम असून डी.जे. मुक्त आंबेडकर जयंतीच्या नावाखाली चळवळीची गळचेपी करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे सचिव व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुनिल माने यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत आंबेडकरी चळवळीतील नेते परशुराम वाडेकर व कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करुन,तक्रारी दाखल करून चालू असलेला बदनामीचा प्रयत्न थांबवावा ‘,असा इशारा आज पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांनी दिला.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. परशुराम वाडेकर,नागेश भोसले,सचिन गजरमल,बाळासाहेब जानराव,राहुल डंबाळे,किरण आल्हाट,संजय आल्हाट,तानाजी ताकपेरे यांच्या सह अनेक मान्यवर या पत्रकार परिषदेत उपस्थित होते .

दरम्यान,आज सकाळी आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांनी परशुराम वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली खडकी पोलीस स्टेशन मध्ये जावून सुनील माने यांच्या विरोधात समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नाविरोधात,तसेच पोलीस यंत्रणेची दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल करावा,अशा आशयाचे निवेदन दिले. दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. ‘पुण्यात अनेक सण ,जयंत्या,उत्सव जाहीररीत्या साजरे होतात.त्यात विविध वाद्ये,स्पीकर आणि डी.जे. लावले जातात . मात्र,नुकत्याच झालेल्या उत्सवात प्लाझ्मा ,डिजिटल स्पिकर्स तसेच लेझर लाईट मुळे डोळे आणि कानांना इजा होण्याचे प्रकार घडले.आधुनिक ध्वनी,लेझर लाईट च्या शोधात असलेल्या कार्यकर्त्यांनी चायनीज गोष्टी ऑनलाईन मागविल्याने आणि त्यांना या यंत्रणेच्या दुष्परिणामांची कल्पना नसल्याने काही जणांना इजा झाली. त्यानंतर सुनील माने यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती डी.जे.मुक्त करण्यासाठी म्हणून एका हॉटेलात काही कार्यकर्त्यांची बैठक बोलवली.प्रत्यक्षात माने यांचा आंबेडकरी चळवळीशी काही संबंध नसून ते भाजप आणि संघाशी संबंधित व्यक्ती आहेत.त्यांनी एकतर हॉटेलात बैठक न घेता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते घेतात अशा आंबेडकर सांस्कृतिक सभागृह ,स्टेशन जवळील आंबेडकर पुतळा ,विहार अशा ठिकाणी बैठक बोलवायला हवी होती . बैठकीनंतर त्यांनी दिलेल्या पत्रकांमुळे पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आगामी वर्षातील डॉ आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. म्हणून आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मालधक्का येथे डॉ आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात बैठक बोलावून अधिकृत भूमिका ठरवली . डॉ आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करण्याबाबत निःसंदिग्ध भूमिका जाहीर करण्यात आली. या बैठकीलाही सुनील माने यांना बोलाविण्यात आले होते . मात्र ,ते आले नाहीत .दरम्यान,सुनील माने यांनी पत्रकार परिषद घेऊन चळवळीतील कार्यकर्त्यांवर गुंडगिरीचे आरोप केले ,गुन्हे दाखल केले. ‘आम्ही डॉ आंबेडकर यांच्या विचारातील चळवळीचे कार्यकर्ते आहोत ,गुंड नाही .आमची हयात आंबेडकर जयंती साजरी करण्यात गेली आहे . तसेच जयंती जल्लोषात साजरी करणे हा गुन्हा नाही ,हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली . डॉ आंबेडकर जयंतीत कोणालाही इजा होईल अशी ध्वनी आणि प्रकाश यंत्रणा वापरली जात नाही ,जाणार नाही . कायद्याच्या परिभाषेत मान्यता असणाऱ्या गोष्टीच वापरल्या जातात ,आणि पुढेही वापरल्या जातील’ ,असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. ‘सुनील माने किंवा अन्य कोणीही त्याबाबत उठाठेवी करू नये’ ,असेही यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. डॉ आंबेडकर यांची जयंती केवळ मिरवणुकीपुरती नसते अनेक वैचारिक ,प्रबोधनपर उपक्रम ,जलसे सुरु असतात. ‘वर्षभर वाचू ,एक दिवस नाचू ‘,ही आमची भूमिका आहे . केवळ डॉ आंबेडकर जयंती नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीतील सर्व उत्सव ,जयंती आम्ही प्रगल्भपणे साजरी करीत असतो ,असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले

सुनिल माने यांनी आपण भाजपाचे पदाधिकारी आहोत हे लपवण्याचे कारण काय ?* आंबेडकर जयंतीत स्पिकरचा वापर असावा या संदर्भात असलेल्या बैठकीचा हवाला देत सुनील माने यांच्या पत्रकार परिषदेत आम्ही न केलेल्या वक्तव्यांची खोटेपणाने वाच्यता केलेली आहे. वास्तविक पाहता आमच्या बैठकीत परशुराम वाडेकर यांनीच ज्यांची समाजात ओळख नाही अशा व्यक्तिंची नावे घेवु नका , नावे घेवुन कोणालाही मोठे करु नका. असे आवाहन केले होते .दुसरी गोष्ट म्हणजे ,सुनिल माने यांनी आपण भाजपाचे पदाधिकारी आहोत हे लपवण्याचे कारण काय ? तरीही माने यांनी परशुराम वाडेकर यांनी धमकी दिल्याचे त्यांच्याकडील पुरावे पुढे आणावेत अथवा कार्यकर्त्यांची माफी मागावी,असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले.

— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज पुणे )

Tags: #ambedkar#ambedkarism#ambedkarites#ambedkarjayanti#babasaheb#babasahebambedkar#bhim#bhimarmy#bhimkanya#bhimrao#bhimraoambedkar#bhimsainik#brambedkar#buddha#buddhism#buddhist#crime#dalit#DGPMaharashtra#drbabasahebambedkar#eaknathshinde#hindjagarnews#india#jaibhim#jatav#jay#jaybhim#jaybhimboys#jaybhimgirls#mahar#maharashtra#nileshpnikam#periyar#periyarism#periyarist#pune#punecity#PunePolice#status
Share7Tweet5Send
Previous Post

सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना भरधाव ट्रक धडकला, एकाचा मृत्यू पुण्यात नवले पुलाजवळ अपघात..

Next Post

म्हाडाचा मात्र अनधिकृत बांधकामांना जाहीर रित्या पाठिंबा !!! पूरग्रस्त वसाहत गोखलेनगर येथे अनाधिकृत बांधकामाचे स्लॅब कोसळून बांधकाम कामगार गंभीर जखमी !!

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks