Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुणेकरांच्या मनातला प्रश्न सीईसीच्या अहवालात नेमकं दडलं तरी काय ?? बहुचर्चित बालभरती , पौडफाटा रस्त्याचे नक्की काय होणार आणि कधी होणार !!!!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 19, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुणेकरांच्या मनातला प्रश्न सीईसीच्या अहवालात नेमकं दडलं तरी काय  ?? बहुचर्चित बालभरती , पौडफाटा रस्त्याचे नक्की काय होणार आणि कधी होणार !!!!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदीजागर न्यूज , प्रतिनिधी , पुणे –  बालभारती-पौडफाटा रस्त्यासंदर्भात दाखल याचिकेनंतर नेमलेल्या सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीच्या (CEC) एकसदस्यीय समितीने त्यासंबंधीचे याचिकाकर्ते, महापालिकेकडून इत्थंभूत माहिती घेतली. प्रत्यक्ष पाहणीही केली. आता त्यासंबंधीचा अहवाल समितीकडून या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून रस्त्यासंबंधीचे आदेश दिले जाण्याची शक्‍यता आहे.

बालभारती-पौडफाटा रस्त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीकडे (सीईसी) पर्यावरणप्रेमींकडून याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती मांडण्यासाठी ‘सीईसी’चे सदस्य सुनील लिमये यांच्या एकसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली होती.
समितीने ५ एप्रिल रोजी याचिकाकर्ते व महापालिकेचे अधिकारी या दोन्हींची बाजू ऐकून घेतली होती. त्यानंतर १२ एप्रिल रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत वेताळ टेकडीवर प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील माहिती, नकाशे सादर केले होते. त्यानंतर सुनील लिमये यांच्या समितीने सोमवारी १५ एप्रिल रोजी याचिकाकर्त्यांसह पर्यावरणप्रेमींसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची बाजू समजून घेतली.यावेळी हा रस्ता करताना वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार नाही, प्रवासातील वेळ वाचणार नाही. त्यामुळे हा रस्ता तयार करून काय साध्य केले जाणार आहे, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी लिमये यांच्या समितीसमोर मांडली होती.
पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेले मुद्दे :- 
१) ‘डीपीआर’मध्ये सेवा रस्ता कसा ??
२ ) खासगी गृहसंकुलांसाठी सेवा रस्ता करण्याचा घाट.
३) रस्ता व कामामुळे टेकडीचे नुकसान, प्रचंड वृक्षतोड होणार.
४) टेकडीच्या पायथ्याला असणाऱ्या नैसर्गिक जलस्रोतांना धोका, भूजल साठ्यावर परिणाम.
 ५) पर्यावरणाचे नुकसान व जैवविविधतेला मोठा फटका बसणार.
६) रस्ता तयार करूनही वाहतूक समस्या सुटणार नाहीत.
७) रस्त्यामुळे वेळेची बचत होण्याची शक्‍यता कमीच.
८) नळस्टॉप, एसएनडीटी प्रमाणेच सिंबायोसिस आणि पौडफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार.
लिमये यांनी १५ एप्रिल रोजी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीवेळी पर्यावरणप्रेमींनी रस्त्याच्या विरोधातील अनेक बारकावे समितीच्या निदर्शनास आणून दिले होते. नकाशे, माहिती व प्रत्यक्षातील स्थिती पर्यावरणप्रेमींनी समितीसमोर मांडली होती. लिमये यांच्या समितीने संबंधित प्रत्येक मुद्यांची गांभीर्याने नोंद घेतली.
दरम्यान, दोन्ही बाजूंकडील नकाशे, माहिती, दृक्‌श्राव्य सादरीकरण, प्रत्यक्ष पाहणी यांचा अभ्यास करून त्यावरील वस्तुनिष्ठ अहवाल समितीने तयार केला आहे. हा अहवाल मे महिन्याच्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे अहवाल सादर करण्याची मुदत पुढे ढकलण्यात आली. संबंधित अहवाल ‘सीईसी’ समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयास सादर केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर न्यायालय बालभारती पौडफाटा रस्त्याबाबतचा आदेश देण्याची शक्‍यता आहे.
Tags: #bjp#covid#crime#DGPMaharashtra#eaknathshinde#india#marathi#nileshpnikam#pune#punecity#punekar#sharadpawar#sharadpawarspeaks
Share7Tweet5Send
Previous Post

औंधमधील नागरिकांनी मांडल्या समस्या वर आमदार सिद्धार्थ शिरोळ यांनी पालिका उपयुक्त अधिकाऱ्यां समवेत चर्चा

Next Post

“छगन भुजबळ नाही तर संपुर्ण अजितदादा गटातील आमदार रामराम ठोकणार”, राज्यात पुन्हा राजकीय भूकप ?

हिंदजागर प्रतिनिधी

"छगन भुजबळ नाही तर संपुर्ण अजितदादा गटातील आमदार रामराम ठोकणार", राज्यात पुन्हा राजकीय भूकप ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks