Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणे पोलिसांच्या आणि गृहविभागाच्या समोर हे टोळीयुद्ध रोखणं मोठं आव्हान असणार आहे.

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
September 4, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे   पुणे पोलिसांच्या आणि गृहविभागाच्या समोर हे टोळीयुद्ध रोखणं मोठं आव्हान असणार आहे.
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे- दिवाळीत फटाके फोडावेत असा गोळीबार करत वनराज आंदेकर यांचा रविवारी रात्री टोळक्याने नाना पेठेत खून केला. या घटनेनंतर काही तासातच हडपसर येथे मोबाईलचे व्हॉटस्पॉट दिले नाही म्हणून एका निरपराध व्यक्तीचे डोकेच चौघांनी कोयत्याने छिन्नविच्छिन्न केले.मागील आठवड्यात सराईत गुंडानी पोलिस अधिकार्‍यावर कोयत्याने वार केले. त्यापूर्वी सिंहगड रोड परिसरात तडीपार गुंडाचा डोक्यात हातोडा घालून खून करण्यात आला. या घटना पाहात पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असाच सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील टोळीप्रमुख आणि त्यांच्या पंटरांची आयुक्तालयात परेड घेतली. त्यांना पोलिसी भाषेत दम भरून शिस्तीचे धडे दिले. मात्र काही कालावधीतच पोलिसी खाक्याला न जुमानता गुन्हेगारांनी आपले काम चोख बजावण्यास सुरुवात केली. वाहनांची तोडफोड, कोयत्याचे वार अन् बंदुकीचे बार सुरू झाले.

वानवडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर सराईत गुंडानी कोयत्याने वार केला. पोलिसांवरच गुन्हेगार वार करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा सवाल उपस्थित होतोय.

वनराज आंदेकरांच्या खुनामुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांतील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा पुढे आला आहे. गोळीबार करून कोयत्याने वार करत वनराज यांचा खून करण्यात आला. त्यामुळे गुन्हेगारांची विकृती कोणत्या थराला गेली असल्याचे दिसून येते. नाना पेठेत वनराज यांच्या नावाचे वलय मोठे, ते जरी गुन्हेगारी विश्वात सक्रिय नसले तरी, आंदेकर टोळीचा मोठा दबदबा, असे असतानाही त्यांचा टोळक्याने खून केला.

गेल्या काही दिवसांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या आणि विनयभंगांच्या घटना

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या, शाळकरी मुलींच्या विनयभंगाच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागल्या आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलींना रिक्षावाले, स्कून व्हॅन चालक, शिक्षक यांच्याकडून विनयभंगाची, अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.

“शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात मागच्या काही दिवसात घडलेल्या घटना कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या आहेत. यातून पुणे शहराची ओळख क्राइम कॅपिटल अशी होत चालली आहे. खून, दरोडे, बलात्कार, चोऱ्या, अवैध धंदे व अमली पदार्थ या दररोजच्या बातम्या बघून सुसंस्कृत पुण्याची देशभरात बदनामी होत असल्याचे जगजाहीर आहे. शहरात टोळी युद्धाचा देखील भडका उडालाय, कोयता गँगच्या दहशतीने पुणेकर भयभीत आहेत. गृहमंत्र्यांनी या घटना गांभीर्याने घ्याव्यात आणि कठोर पावले उचलावीत”

आता पुन्हा तोच सवाल आहे की, वनराजच्या मृत्यूनं पुण्यातलं हे टोळीयुद्ध संपलंय की सुरु झालंय. एकूणच पोलिसांच्या आणि गृहविभागाच्या समोर हे टोळीयुद्ध रोखणं मोठं आव्हान असणार आहे.

— गणेश मारुती जोशी.

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#maharashtra#pmc#police#politics#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल 100 फुटी पुतळ्याला तडे; पालिकेचं स्पष्टीकरण…

Next Post

गणेशोत्सव येताच सहा IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या…

हिंदजागर प्रतिनिधी

गणेशोत्सव येताच सहा IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks