Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

‘तुतारी’समोर पिपाणीचं आव्हान, शरद पवारांच्या दोन मागण्या मान्य पण…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 15, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
‘तुतारी’समोर पिपाणीचं आव्हान, शरद पवारांच्या दोन मागण्या मान्य पण…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला त्यांच्या चिन्हामुळे काही ठिकाणी फटका बसला होता. त्यांचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे, मात्र, अशाच प्रकारचे तुतारीचे चिन्ह काही उमेदवारांना मिळाल्याने त्यावेळी मतदारांचा गोंधळ उडाल्याने काही ठिकाणी मतांचा फटका सोसावा लागला होता.

यावेळी असा प्रकार टाळण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे तीन विनंत्या केल्या होत्या. त्यापैकी दोन मागण्या निवडणूक आयोगाने मान्य केल्या आहेत.

काय होत्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या तीन विनंत्या?

पहिली विनंती : राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली होती. निधी स्वीकारण्यास मान्यता द्यावी

निवडणूक आयोगाचा निर्णय: ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

दुसरी मागणी : तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह, वोटिंग मशीनवर लहान दिसतं, ते मोठं करावं

निवडणूक आयोग : वोटिंग मशीनवर चिन्ह कसं दिसावं, त्यांनी तीन पर्याय दिले होते, त्यापैकी पहिला पर्याय स्वीकारला आहे.

तिसरी मागणी: ट्रम्पेट हटवावं

निवडणूक आयोग : तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट हे वेगळं दिसतं त्यामुळं हटवता येणार नाही हे सांगितलं.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवेळी बोलताना केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले, राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या तीन विनंत्या आल्या होत्या. त्यापैकी राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली होती. त्याचप्रमाणे आता त्यांना निधी स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह, वोटिंग मशीनवर लहान दिसतं, ते मोठं करावं त्याप्रमाणे त्यांना दिलेल्या पर्यायापैकी त्यांनी पहिला पर्याय मान्य केला आहे, आता ते चिन्ह मोठं दिसेल. तर तिसरी त्यांची मागणी होती. ट्रम्पेट हटवावं, मात्र, तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट हे वेगळं दिसतं त्यामुळं हटवता येणार नाही हे सांगितलं.

लोकसभेला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ऐवजी ‘पिपाणी’ला मतं

‘तुतारी वाजवणार माणूस’ हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे निवडणूक चिन्ह दिले होते. त्यामुळे मतदारांचा गोंधळ झाला आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ऐवजी ‘पिपाणी’ला अनेक ठिकाणी मतदान अधिक झाल्याचा राष्ट्रवादीने दावा केला होता. सातारा, दिंडोरी, रावेर, भिवंडी, शिरूर अशा जागांवर पिपाणी या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला मोठी मत मिळाली होती.

पिपाणी चिन्ह असणाऱ्यांना किती मतं?

रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरुर, अहमदनगर, बीड, सातारा या जागांवर पिपाणी या चिन्हांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना कित्येक मतं पडली होती. रावेर या जागेवर पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे एकनाथ साळुंके यांना 43 हजार 957 मतं पडली होती. त्याच प्रमाणे दिंडोरी या जागेवरून बाबू भगरे (सर) यांना 1 लाख 3 हजार 632 मते पडली. भिवंडी जागेवर कांचन वखरे यांना 24 हजार 625 मते मिळाली. बारामती या जागेवर शेख सोएलशहा यांना 14 हजार 917 मते पडली. शिरुरमध्ये मनोहर वाडेकर यांना 28 हजार 324, अहमदनगरमध्ये गोरख आळेकर यांना 44 हजार 597, बीडमध्ये अशोक थोरात यांना 54 हजार 850 मते, साताऱ्यात संजय गाडे यांना 37 हजार 62 मते पडली होती. यावेळी देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

— गणेश मारुती जोशी.

Tags: #ajitpawarspeaks#congressparty#Congresspune#DGPMaharashtra#eaknathshinde#election#hindjagarnews#maharashtra#mnsadhikrut#ncp#ncpmaharashtra#ncpspeaks#nileshpnikam#police#sharadpawar#sharadpawarspeaks#shivsena
Share7Tweet5Send
Previous Post

दीपक मानकरांना डावलल्यामुळं शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पहिली ठिणगी..

Next Post

६०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार निवेदन देत सामूहिक राजीनामा दिले ..विधानपरिषदेची आमदारकी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks