HindJagar News – Repoter – Pune – पुण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मते, या बदल्या प्रशासकीय कारणांमुळे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सोसायटीच्या अध्यक्षांकडून गुन्हे शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या कॉप २४ युनिटमधील तीन पोलीस अंमलदारांनी ३ हजार रुपयांची लाच घेतल्यामुळे या बदल्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांची कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांची बाणेर पोलिस ठाण्याचे नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक महेश बोलकोटगी यांची शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महेश बोलकोटगी यांनी याआधी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून देखील काम पाहिले होते. ती त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती त्यांच्या काळामध्ये ३ वेळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच २ वेळा भारताचे गृहमंत्री यांचे दौरे झाले होते त्याबाबतचे योग्य व चौक बंदोबस्त नियोजन त्यांच्या देखरेखी खाली पार पडला होता.मे २०२४ मध्ये मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक-युवतीचा मृत्यू झाला. या अपघाताची चर्चा देशभर झाली. त्यावेळीस ते कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी यांनी मात्र, हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. १९ मे २०२४ रोजी घडलेल्या अपघातानंतर अल्पवयीन मुलाचा बाप, आई, आजोबा, डॉक्टर, ससूनचा शिपाई, बार चालक अशा सगळ्यांना अटक करण्यात आली होती. आज या घटनेच्या आठ महिन्यांनंतरही हे दोषी येरवडा कारागृहात असून, पोलिसांनी सिद्ध केलेल्या रक्त नमुन्यातील बनवाबनवीमुळेच ते आजपर्यंत जामिनावर सुटू शकले नाही. तसेच चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या आधी मध्ये अनेक गुरेगारांना पोलिसी खाक्या दाखवल्या.
आता छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे धडाकेबाज अधिकारी आली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महेश बोलकोटगी यांचे छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये नागरिकांनी भेट घेऊन सत्कार करत तसेच पेढे वाटून त्यांचे स्वागत केले.बोलकोटगी साहेब यांच्या कडून पहिल्या दिवसापासूनच अवैध दारू, मटका अड्डयांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर जनतेत आनंदाचे वातावरण आहे.
— अमित पाचुंदकर( गोली ग्रुप अध्यक्ष व स्थानिक रहिवासी )
२१ एप्रिल रोजी झालेल्या पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमुळे संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये एक नवीन गतिमानता येईल आणि पुणे पोलिस विभागाची एकूण कार्यक्षमता वाढेल अशी अपेक्षा आहे.
—- गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )














