Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

एकाच मंचावर पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया ताई, अजित दादा एकत्र येणार..भावनांचा बांध फुटणार का ?

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 18, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
एकाच मंचावर पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया ताई, अजित दादा एकत्र येणार..भावनांचा बांध फुटणार का ?
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी फूट पडलीय. पक्ष दोन गटात विभागला गेलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे पक्ष दोन गटात विभागला गेलाय.पक्षाच्या सर्वाधिक आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला विरोध केलाय. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व सहकाऱ्यांनी जी भूमिका घेतलीय ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. संबंधित भूमिका पक्षाची नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.पण अजित पवार यांच्या गटाने पूर्ण पक्षावरच दावा केलाय. त्यामुळे दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरु झालीय.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांची आता निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात लढाई सुरु झालीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेसारख्याच घडामोडी घडत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीत काही गोष्टींमध्ये साम्यता असली तरी काही गोष्टी या वेगळ्या घडल्या आहेत. कारण पक्षात फूट पडल्यानंतरही अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह शरद पवार यांची याआधी भेट घेतलीय. या सर्व नेत्यांनी शरद पवार यांना सत्तेत सहभागी होण्याची विनंती केली. पण शरद पवार यांनी ती विनंती फेटाळली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. अनंतराव पवार इंग्लिस स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पवार कुटुंबिय एकत्र येणार आहेत. भिगवणमध्ये 22 ऑक्टोबरला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या तीनही नेत्यांची नावे आहेत.

अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांनीदेखील शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सत्तेत सहभागी होण्याची विनंती केली. पण तरीही ते आले नाहीत. या सर्व घडामोडींनंतर निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. शरद पवार हे पक्षात मनमानी करतात. पक्षात निवडणूक पद्धतीने नियुक्ती केली जात नाही. एका सहीने नियुक्ती केली जाते, असा आरोप अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला.शरद पवार हे पक्षात हुकूमशाह सारखे वागतात, असा गंभीर आरोप अजित पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला. अजित पवार गटाचा हा युक्तिवाद शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे भर पत्रकार परिषदेत त्यांना रडू कोसळलं होतं. या सर्व घडामोडींनंतर आता दोन्ही गटाचे दिग्गज नेते एकाच मंचावर एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. — अजित पवार गटाचा शरद पवारांवर गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात बहीण-भावाच्या नात्यावर भाष्य केलं होतं. अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींवर बोलताना सुप्रिया ताईंना अश्रू अनावर झाले होते. सुप्रिया सुळे यांना यावेळी रडू कोसळलं होतं. त्यामुळे आता प्रत्यक्ष या कार्यक्रमात अजित दादा देखील असणार आहेत. याशिवाय शरद पवारांची देखील हजेरी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.

=== गणेश मारुती जोशी (प्रतिनिधी )

Tags: #adityathackeray#ajitdada#ajitdadapawar#ajitpawar#ajitpawarfc#ajitpawarspeaks#akurdi#amolkolhe#aundh#balasahebthackeray#baner#baramati#chinchwad #mumbai#DGPMaharashtra#dhananjaymunde#eaknathshinde#hindjagarnews#hinjewadi#ig#india#instagood#instagram#jayantpatil#kolhapur#love#maharashtra#marathi#mumbai#ncp#ncpspeaks#ncpspeaksofficial#nileshpnikam#pawarsaheb#pcmc#photography#pimplesaudagar#pimpri#pimprichinchwad#politics#pune#punecity#punediaries#punefoodie#puneinsta#punekar#punekars#PunePolice#puneri#rohitpawar#saheb#sharadpawar#sharadpawarfc#sharadpawarspeaks#shivsena#supriyasule#trending#uddhavthackeray#viral#wakad#yuvasena
Share7Tweet5Send
Previous Post

मनसेने यावेळी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले लोकसभा लढण्याची तयारी सुरू,तरी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढविण्यासाठी मी तयार आहे -मा.नगरसेवक वसंत मोरे (म.न.से)

Next Post

पिंपरी महापालिकेत बिल्डरला लाथा – बुक्क्यांनी भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीचा मारहाणीचं CCTV फुटेज समोर..

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पिंपरी महापालिकेत बिल्डरला लाथा – बुक्क्यांनी भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीचा मारहाणीचं  CCTV फुटेज समोर..

पिंपरी महापालिकेत बिल्डरला लाथा - बुक्क्यांनी भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीचा मारहाणीचं CCTV फुटेज समोर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks