Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरात शासनामुळे अंधार..नोकरभरती करताना खासगी तत्त्वावर तुटपुंज्या पगारावर झुलवत ठेवले ?? शासनाने गेली कित्येक वर्षापासून विविध शासकीय विभागातील रिक्त पदे !!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 24, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरात शासनामुळे अंधार..नोकरभरती करताना खासगी तत्त्वावर तुटपुंज्या पगारावर झुलवत ठेवले ?? शासनाने गेली कित्येक वर्षापासून विविध शासकीय विभागातील रिक्त पदे !!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – Pune – दिवाळी हा प्रकाशाचा सण. सर्वत्र प्रकाशाचा झगमगाट सुरू असला तरी एजन्सीमार्फत खासगी तत्त्वावर पाठविण्यात आला आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या 102 रुग्णवाहिकाचालकांसह परिचर महिलांच्या घरामध्ये मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ‘अंधार’ पसरला आहे.गेल्या दहा महिन्यांपासून त्यांना वेतनापोटी एक छदामदेखील दिलेला नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. पगार झाल्यानंतरच आमची दिवाळी होईल, असे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, 25 ऑक्टोबरपर्यंत वेतन न दिल्यास 26 तारखेपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा रुग्णवाहिका चालक संघटनेने प्रशासनाला दिला आहे.

या मागणीबाबत रुग्णवाहिका चालक संघटनेने मागणीचे निवेदन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनासाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, येत्या आठ ते दहा दिवसांत हा प्रश्न निकाली निघणार आहे, असे सांगितले होते. महिना उलटूनही दहा महिन्यांचा पगार न मिळाल्याने संपूर्ण राज्यासह पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नेमण्यात आलेले रुग्णवाहिका चालक, परिचर महिलांना घरखर्च भागवणे कठीण झाले असून, ऐन दिवाळीच्या दिवसांत उसनवारी करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे.

शासनाने गेली कित्येक वर्षापासून विविध शासकीय विभागातील रिक्त पदे भरण्याऐवजी शनिवारपासून काम बंद नोकरभरती करताना खासगी तत्त्वावर तुटपुंज्या पगारावर झुलवत ठेवले असताना, तो तुटपुंजा पगारसुद्धा वेळेत मिळत नसल्याने खासगी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या दहा महिन्यांपासून पगारच मिळाला नसला तरी हे लाडकी बहिणी आणि लाडके भाऊ पोटाला चिमटा घेऊन घरखर्च, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी तारेवरची कसरत करत आहेत. पगारच मिळत नसल्याने सणसुद्धा साजरा करता आले नसल्याची खंत या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

राज्यात शासनाचे 1906 प्राथमिक आरोग्यकेंद्राची संख्या आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे 108 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. जिल्ह्यातील खासगी एजन्सीमार्फत 96 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिकेसाठी चालकांची तब्बल 14-15 वर्षांपासून नेमणुका करण्यात आल्या, तर दोन वर्षांपासून 96 प्राथमिक आरोग्य केंद्रावर महिला परिचर यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. रुग्णवाहिका चालकांना दरमहा 1930 रुपये तर महिला परिचरांसाठी दरमहा 8 हजार रुपये पगार खासगी एजन्सीमार्फत शासन नियमानुसार कपाती करून मिळतो. गेले दहा महिने होऊन काम करूनही एक छदाम हातात न मिळाल्यामुळे या आरोग्य सेवेतील खासगी तत्त्वावर तुटपुंज्या मानधनावर काम करणारे रुग्णवाहिका चालक परिचर महिला मोठ्या आर्थिक अडचणीतसा सापडले आहेत.

शासन दुसऱ्या योजनांचा निधी वळवून लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाची ओवाळणी केली. मात्र आरोग्याची सेवा करणाऱ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ मात्र हक्काच्या मानधनापासून गेले दहा महिन्यांपासून वंचित आहेत. सतत पाठपुरावा करूनदेखील वेतन मिळत नसल्याने अखेर रुग्णवाहिका चालकांनी 26 ऑक्टोबरपासून काम बंदचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.

त्वरित निर्णय घ्यावा

■ राज्यभरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. डेंग्यू, चिकुनगुणियाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, हे रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यास आरोग्य यंत्रणाच कोलमडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

—-Vinod Dattraya Waghmare.

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#maharashtra#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

लालबागच्या राजाचरणीची ‘ती’ चिठ्ठी पुन्हा चर्चेत..सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली..

Next Post

बारामतीत पुन्हा देशाचं लक्ष वेधणारी ऐतिहासिक निवडणूक!अजितदादां विरोधात युगेंद्र पवारांनी दंड थोपाटले, विधानसभेची उमेदवारी मिळताच पहिली प्रतिक्रिया समोर..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks