HindJagar News – Pune – कात्रज भागातील पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाला मारहाण करुन साडेतीन लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन अल्पवयीनांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीनांनी केलेल्या मारहाणीत व्यवस्थापक जखमी झाला होता.याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तक्रारदार तरुण पेट्रोल पंपावर व्यवस्थापक आहे. १३ जानेवारी रोजी दुपारी पेट्रोल पंपावर जमा झालेली तीन लाख ४६ हजारांची रोकड घेऊन तो बँकेत भरणा करण्यासाठी निघाला होता. त्यावेळी कात्रज-कोंढवा रस्त्यावर त्याला अडवून अल्पवयीनांनी दांडक्याने मारहाण केली. त्याच्याकडील रोकड असलेली पिशवी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. त्याने अल्पवयीनांना विरोध केला. त्यानंतर अल्पवयीन पसार झाले. जखमी अवस्थेतील व्यवस्थापकाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपींचा शोध घेणेबाबतच्या मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार महेश बारवकर, चेतन गोरे यांनी घटनास्थळापासुन कात्रज कोंढवा रोडवरील सर्व सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक केले असता त्यांना त्यामध्ये त्यांना तीन संशयीत इसम दिसुन आले. त्या संशयीत इसमांचा नमुद अंमलदार यांनी शोध घेतला असता त्यांना तीन विधीसंघर्षीत बालकांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी त्या तीन बालकांना ताब्यात घेवुन चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.
Repoter – Ganesh Maruti Joshi.














