हिंदजागर न्यूज , पुणे – प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा दावा करणाऱ्या यंत्रणेचा डोलारा सध्या डळमळीत झालेल्या दिसत आहे. एकीकडे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी पुणे शहरात सार्वजनिक रस्ते खोदायी करण्यास मनाई केली असताना कुसाळकर पुतळा चौक ते वेताळबाबा चौका पर्यंत बेकायदेशीर रस्ता खोदाई करण्यात आली आहे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राजरोसपणे दिवस रात्र कुठलीही भीती न बाळगता तसेच नियम धारेवर धरून परवानगी नसताना सुद्धा काम करीत आहेत. याबाबत पालिकेकडे तक्रार करून देखील प्रशासनाकडून जाणीवपूर्व दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे एकीकडे परवानगी द्यायची नाही आणि दुसरीकडे बेकायदेशीर खोदाई कडे दुर्लक्ष करायचे त्यामुळे पालिकेचे मात्र कोट्यावादीचे उत्पन्न बुडत आहेत हे अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊन सुद्धा अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असून सुद्धा कनिष्ठ अधिकारी कारवाई न करता वेळ काढण्याची भूमिका घेत आहे .
पुणे महानगरपालिकेने रस्ते खोदाईसाठी दिलेल्या १५ मे ची मुदत संपल्यानंतर ही कुसाळकर पुतळा चौक ते वेताळबाबा चौका या ठिकाणी खुदाई सुरू आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी तत्काळ हे खोदाई थांबवावी तसेच दंडात्मक आणि फौजदार कारवाई करायचं करावी अशी सामाजिक कार्यकर्त्याची निलेश प्रकाश शेठ निकम मागणी केली आहे. पालिका,स्मार्ट सिटी,महावितरण,खाजगी नेटवर्किंग कंपन्या यांच्यासह विविध शासकीय-निमशाचकीय संस्था ,स्थापत्य ,विद्युत ,पाणीपुरवठा , जलनिसरण,केबल आणि पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते व पदपथ खोदतात. मात्र खोदकामानंतर व्यवस्थित दुरुस्ती न झाल्याने पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो त्यामुळे पुणे महानगरपालिकेने १५ मे नंतर खोदाईस बंदी घातली होती याबाबतची तक्रार सुद्धा श्री.निकम यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे केली होती व त्या मागणीला त्यावेळी त्यांना यश आले होते व पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी रस्ते खोदाई परवानगी बंदी घातली होती.
मात्र मागील एक आठवड्यांपासून कुसाळकर पुतळा चौक ते वेताळबाबा चौका पर्यंत पुणे महानगरपालिकेचे खोदाईचे नियम धाब्यावरती बसून परवानगी नसताना सुद्धा बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात रस्ता खोदाई करून ड्रेनेज लाईन टाकण्याचा घाट पुणे महानगरपालिकेच्या ठेकेदारा कडून करण्यात आला आहे. संबंधित काम करत असताना कुठल्याही प्रकारचे सुरक्षा यंत्रणाची काळजी घेतली जात नसल्याचे आढळून आले आहे तसेच परवानग्या नसताना व सदर रस्ता रहदारीचा आहे व अशा बेकायदेशीर कामांच्या खोदाईमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीवित आणि होण्याची शक्यता दाट असल्याकारणाने अशा बेकायदेशीर चाललेल्या कामांवरती त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करायला काही हरकत नाही सदर कामाला ट्रॅफिक विभागाने दिलेली पपरवानगीची मुदत सुद्धा संपली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गोरा बिल्डरने बेकायदेशीर रस्ता खोदाई केली म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आलेल्या तक्रारीवरून गोरा बिल्डर यांच्या विरुद्ध कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल करून १ ऑगस्ट २०२४ रोजी पालिकेच्या कोषगारात ६ कोटी ९४ लाख 8 हजार 800 रुपये इतका दंड सदर बिल्डरने भरला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दंड वसूल केला असे असताना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पुरावे सहित तक्रारी देऊन सुद्धा पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी सदर पुणे महानगरपालिकेचे ठेकेदाराला SHOW CAUSE नोटीस बजावून संबंधित कनिष्ठ अभियंता ( J.E ) वरती सुद्धा SHOW CAUSE नोटीस देण्यासाठी सांगितले असताना सुद्धा याच विभागाचे कार्यकारी अभियंता मात्र वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांना धुडकावत ठेकेदाराबरोबरचे हित जपत कारवाई करत नाही ही अतिशय शोकांतिका ची गोष्ट आहे कदाचित कार्यकारी अभियंता साहेबांना पुणे महानगरपालिकेच्या महसूल मध्ये वाढ करण्याची इच्छा दिसत नाही अथवा यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या कार्यकारी अभियंता यांच्याविरुद्ध प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी तसेच या कामांमध्ये असलेले कनिष्ठ अभियंता ( J.E ) यांना या चाललेल्या बेकायदेशीर कामाची संपूर्ण कल्पना असताना सुद्धा व संबंधित ठेकेदाराने पुणे महानगरपालिकेच्या खोदायची दिलेल्या परवानगी मध्ये स्थानिक वृत्तपत्रांमध्ये संबंधित मिळालेल्या कामाबाबत जाहिरात देऊन त्याचे कात्रण पुणे महानगरपालिकेकडे जमा करूनच खोदाई चालू करण्याची अट असताना सुद्धा जाहिरात न देता खोदाई केली तसेच सुरक्षा बाबतची कुठलीही यंत्र राबवली नाही असे असताना तक्रार आल्यानंतर सुद्धा कनिष्ठ अभियंता ( J.E ) यांनी मूग गिळून आज रोजी पर्यंत कारवाई केली नाही म्हणून या बेकायदेशीर खोदाईला व संबंधित ठेकेदाराला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा देत आपले आर्थिक हित जपले यामुळे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी अन्यथा यामध्ये जन आंदोलन केले जाईल व याची संपूर्ण जबाबदारी ही पुणे महानगरपालिका आयुक्त ची राहील अशी मागणी श्री.निलेश प्रकाशशेठ निकम या प्रकरणातील तक्रारदार यांनी केली आहे .
प्रीतिनिधी – श्री.गणेश मारुती जोशी.














